दुबई : उपासमारीने प्राण जात असेल तर पतीने आपल्या पत्नीला ठार मारून तिचे मांस खावे असा अजब आणि धक्कादायक फतवा उच्चस्त साउदी शेख यांनी काढला असल्याची बातमी समोर येत आहे.
साऊदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुल अझीझ बीन अब्दुल्ला यांनी हा अजब फतवा दिल्याची बातमी मिरर या वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान मुफ्ती यांनी अशा प्रकारचा फतवा काढल्याचा इन्कार केला आहे.
पत्नीचा त्याग आणि पतीची आज्ञाधारकता यावर प्रकाश टाकण्यासाठी अशा प्रकारचा फतवा काढण्यात आल्याचे या बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, अशा प्रकारचा कोणताही फतवा काढण्यात आला नसल्याचे मुफ्तींकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. साउदी प्रेस एजन्सीमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारची बातमी पसरविणे हे शूत्रांचा भाग आहे. समाजाला त्यांच्या मुख्य उद्देशापासून भटकविणे असा त्यांचा उद्देश आहे. मुस्लिम जगताविरोधात हा कट करण्याचा प्रयत्न आहे.
यापूर्वीही आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अब्दुल अझीझ बिन अब्दुल्ला प्रसिद्ध आहेत. त्यांनी म्हटले होते की, इस्लामिक कायद्यानुसार सर्व चर्च उद्धवस्त केली पाहिजे.
या संदर्भात सीएनएन अरेबीने दिलेल्या बातमीनुसार अशा प्रकारचा फतवा एक उपाहासात्मक ब्लॉगरने दिला होता. त्याला इस्राफेल अल-मग्रीबी म्हणतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.