लंडन : जागतिक तापमानवाढीचा पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर विपरित परिणाम होत आहे. याचा ज्या प्राण्यावर जास्त वाईट परिणाम होतोय तो प्राणी म्हणजे ध्रुवीय अस्वल.
जागतिक तापमानवाढीशी सामना करण्यात हा प्राणी अयशस्वी ठरतोय. त्यामुळे या प्राण्याला त्याचे अन्न शोधणेही कठीण जात आहे. आता याचा परिणाम या प्राण्याच्या शिकारीच्या सवयींवरही झाल्याचं लक्षात येत आहे.
या खाली दिेलेल्या व्हिडिओमध्ये ध्रुवीय अस्वलातील एक नर एक मादी आणि तिच्या पिल्लाचा पाठलाग करताना दिसतात. आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी ही मादी पुरेपूर प्रयत्न करते. मात्र शेवटी ती अयशस्वी ठरते. हा नर त्या पिल्लाची शिकार करुन त्याचे भक्षण करतो.
'नॅशनल जिऑग्राफी'च्या एका टीमने आर्क्टिक खंडाला भेट दिली तेव्हा हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओतील चित्र तुम्हाला विचलीत करू शकतात.