हेग : अमेरिकेतील चॉकलेट कंपनी मार्सने मंगळवारी हॉलंड येथील मार्स आणि स्निकर्स बार्स आंतरराष्ट्रीय बाजारातून परत मागविले आहेत. एका चॉकलेटममध्ये प्लास्टिकचा तुकडा सापडल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात जर्मनीमध्ये एका ग्राहकाच्या स्निकर्समध्ये लाल प्लास्टिकचा एक तुकडा सापडला होता. त्यानंतर ५५ देशातील लाखो चॉकलेट बार्सला असुरक्षित मानले गेले.
कंपनीने हे पाऊल उचलल्यानंतर मिल्की वे मिनी या चॉकलेटवरही परिणाम होणार आहे. या चॉकलेट कंपनीच्या युरोपमधील व्यापारावर परिणाम होणार आहे. या कंपनीचा व्यापार भारतासह आशियातील व्हिएतनाम आणि श्रीलंकेपर्यंत पसरला आहे.