VIDEO : स्केटिंग करताना ती १००० फूट खोल दरीत कोसळली

अमेरिकेतील अलास्कामध्ये एक स्कीयर एक हजार फूट खोल दरीत कोसळूनही बचावलीय

Updated: Jan 28, 2016, 11:24 AM IST

मुंबई : अमेरिकेतील अलास्कामध्ये एक स्कीयर एक हजार फूट खोल दरीत कोसळूनही बचावलीय. यू ट्यूबवर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 

एंजेल कॉलिंसन असं या स्कीयरचं नाव आहे. एका चित्रपटाच्या शूटींगसाठी ती स्कीयींग करीत असताना तीचं संतुलन बिघडलं आणि ती एक हजार फूट खोल दरीत कोसळली.

 विषेश म्हणजे एवढ्या खोल दरीत कोसळल्यानंतरही तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. पण, हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा उभा करू शकतो.