लंडन : स्पेनमध्ये जगातील पहिला गर्भनाळ स्टेम सेलच्या माध्यमातून एचआयव्हीचा इलाज करणे सुरू आहे. त्याचे क्लिनिकल परिक्षण सुरू आहे. जगातील अशा प्रकारचा पहिला क्लिनिकल ट्रायल असणार आहे, 'द बर्लिन पेशेंट' नावाने प्रसिद्ध असलेले टिमोथी रे ब्राऊन यांना ज्या पद्धतीने वाचविले तसेच पुन्हा करण्याची इच्छा आहे.
ब्राऊन एचआयव्हीच्या पूर्ण इलाजानंतर जीवंत असलेला एकमेव व्यक्ती आहे. या क्लिनकल परिक्षणाची घोषणा गेल्या आठवड्यात स्पेनच्या नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ट्रान्सप्लांटेशन (ओएनटी) एका कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले.
'द लोकल' च्या रिपोर्टनुसार ओएनटीने १५७ डोनर्सचे परिक्षणासाठी निवड करण्यात आली. जे अनुवंशिकतेने उत्परिवर्तनला सहयोग करणारे आहेत. डॉक्टरांना आशा आहे पहिल्या रुग्णावरील इलाज या डिसेंबरमध्ये किंवा पुढील वर्षी जानेवारीत माद्रीदमध्ये सुरू होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.