बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Updated: Sep 25, 2015, 05:44 PM IST
बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद  title=

न्यू यॉर्क :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

मोदी यांनी गुरूवारी ४० सीईओसोबत डिनर तयार करणाऱ्या सुप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना झेंडा दिला. खन्ना हा झेंडा ओबामा यांना देणार आहेत. 

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकाऱ्या हा झेंडा परत घेतला आहे. मोदी यांनी तिरंग्यावर सही केल्याची बातमी आणि फोटो समोर आल्यानंतर यावर वाद निर्माण झाला होता. म्हटले जाते की मोदी यांनी फ्लॅग कोडचे उल्लंघन केले आहे. 

फ्लॅग कोडनुसार तिरंग्यावर काहीही लिहिता येत नाही. काही पत्रकारांचे मत आहे की यात काही मोठी गोष्ट नाही. पण या प्रकाराचा ऑनलाइन मीडियामध्ये खूप विरोध करण्यात आला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.