मीना : मुस्लिमांचे सर्वात मोठे तीर्थ स्थळ साऊदी अरबमध्ये मक्काजवळ असलेल्या रमीजमारातमध्ये सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा पूर्ण केल्यावर हज यात्रा पूर्ण झाल्याचे मानले जाते.
अधिक वाचा : मक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर
हज यात्रेतील हा सर्वात खरतनाक आणि आव्हानात्मक पडाव मानला जातो. सैतानाला दगड मारण्याची प्रथा तीन दिवस चालते. ईद-उल-जुहाला या सणानिमित्त ही प्रथा सुरू होते. त्यामुळे या दरम्यानच सर्व तीर्थयात्री सैतानाला दगड मारण्याची प्रथा पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात. हजला गेलेले लोक तिसऱ्या दिवसानंतर आपल्या बेस कँपवरून रमीजमारात या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी मोठे खांब आहेत.
सैतानाला दगड मारण्याची गोष्ट
हे खांब सैतान आहेत. त्यांना दगड मारले जातात, या प्रथेनंतर हजची यात्रा पूर्ण होते. असे मानणे आहे की एकदा अल्लाहने हजरत इब्राहीम यांच्याकूडन कुर्बानी म्हणून त्यांची आवडती गोष्ट मागितली, हजरत इब्राहिम यांना एक मुलगा होता. त्याचे नाव इस्माईल. हजरत इब्राहिमचा हा मुलगा वृद्धापकाळात जन्माला आला होता. त्यामुळे ते त्याच्यावर खूप प्रेम करत होते. पण अल्लाहचा आदेश मानून आपल्या काळजाच्या तुकड्याचा कुर्बानी देण्याचे हजरत इब्राहिम यांनी ठरवले. हजरत आपल्या मुलाला घेऊन कुर्बानी देण्यासाठी जात होते.
तेवढ्यात रस्त्यात त्यांना सैतान भेटला. त्याने सांगितले की या वयात का आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी जात आहात. तो मेल्यानंतर तुमची देखभाल कोण करणार. हे ऐकल्यावर हजरत इब्राहिम विचारात पडले. कुर्बानी देण्याच्या विचारापासून डगमगत होते. पण कसे तरी त्यांनी स्वतःला सांभाळले आणि कुर्बानी देण्यासाठी गेले. भावना आपल्या कर्तव्याचा आड येऊ नये म्हणून हजरत इब्राहिम यांनी डोळ्याला पट्टी बांधली. आपले काम केल्यानंतर डोळ्यावरून पट्टी काढली तर त्यांचा मुलगा जिवंत होता. समोर पडलेला बकरा होता. तेव्हापासून बकऱ्याची बळी देण्याची प्रथा आहे.
यामुळे मुसलमान हजच्या शेवटच्या दिवशी बकरी ईदला कुर्बानी दिल्यानंतर रमीजमारात पोहचून सैतानाला दगड मारतात. ज्या सैतानाने इब्राहिम यांना धोका देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही प्रथा सुरू झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.