अल्जिअर्स : अल्जेरियाच्या हवाई वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, त्यांचा एअर अल्जेरी विमानाशी संपर्क तुटला आहे. हे विमान पश्मिम आफ्रिकेत कोसळलं असल्याचं स्थानिक मीडियाने म्हटलंय
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार फ्लाईट एएच 5017 मध्ये 110 प्रवासी प्रवास करत होते, यात चालक दलाचे सहा सदस्य आहेत.
पश्चिम आफ्रिकेमधील बुकिना फासो या देशाच्या राजधानीतून उड्डाण केलेल्या ‘एअर अल्जिरी‘ या विमानसेवेच्या विमानाचा संपर्क तुटला आहे. मात्र आता हे विमान पश्मिम आफ्रिकेत कोसळलं असल्याचं स्थानिक मीडियाने म्हटलंय
उड्डाण झाल्यानंतर 50 मिनिटांनी या विमानाचा संपर्क तुटल्याचे विमान कंपनीने स्पष्ट केले.
बुकिना फासो या देशाची राजधानी वागादुवू (Ouagadougou) ते अल्जिअर्स या मार्गावरील ‘ए-एच 5017‘ या विमानाच्या शोधासाठी आपत्कालीन योजना कार्यान्वित केल्याचे विमान कंपनीने सांगितले.
बेपत्ता झालेल्या या विमानाची एकूण क्षमता 135 प्रवाशांची असली, तरीही प्रत्यक्षात त्यात किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये 110 प्रवासी होते आणि पोर्तुगालमधील एका कंपनीने ते भाड्याने घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.