www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इराकमध्ये सुरू असलेल्या या धुमश्चक्रीचा भारतावरही परिणाम होणार आहे. इराकमधल्या या संकटामुळे कच्चा तेलाचा भाव प्रति बॅरल १०७ डॉलर्सवर पोहोचलाय. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव ११४ डॉलर प्रति बॅरल झालाय.
किरकूक पाईपलाईन वाचवण्याचा प्रयत्न कुर्दीश सेना करत आहे. किरकूक पाईपलाईनमधून प्रत्येक दिवशी ६ लाख बॅरल कच्चा तेलाचा पुरवठा होतो.
तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेक या संघटनेतला इराक हा तेल उत्पादनातला दोन नंबरचा देश आहे. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी १३ टक्के आयात इराकमधून होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.