बिनधास्त पाडून टाका अशा भिंती

जर्मनीच्या भिंतीविषयी आज गुगलने डुडल तयार केलं आहे. जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत १९९० च्या करारानुसार टप्प्याटप्प्याने पाडून टाकण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने गुगलने विशेष डूडल तयार केले आहे. 

Updated: Nov 9, 2014, 04:01 PM IST
बिनधास्त पाडून टाका अशा भिंती title=

न्यूयॉर्क : जर्मनीच्या भिंतीविषयी आज गुगलने डुडल तयार केलं आहे. जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत १९९० च्या करारानुसार टप्प्याटप्प्याने पाडून टाकण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने गुगलने विशेष डूडल तयार केले आहे. 

गुगलने सर्च इंजिनच्या लोगोवर एक मिनिटाचा व्हिडीओ लावला आहे, हे डूडल जगभर दिसतंय. भिंत पाडतानाचे तसेच भिंत असलेल्या स्थळाची सद्यस्थिती या डूडलमध्ये दर्शविण्यात आली आहे. यासाठी गुगलने आपल्या विविध सहकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या १७ आंतरराष्ट्रीय चित्रफितींचा वापर केला आहे. 

तसेच जर्मनीच्या राष्ट्रीय संग्रहातील (German Federal Archives) छायाचित्रांचाही वापर करण्यात आला आहे. गुगल वापरणाऱ्या नेटिझन्सनीही यासाठी मदत केल्याचे गुगलने म्हटले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.