बर्लिन : फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.
‘इसिस' (ISIS ) या कट्टर दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव जर्मनीच्या संसदेमध्ये बहुमताने मंजूर झाला. यामुळे आता सीरियावर थेट लष्करी कारवाई करण्याचा जर्मनीचा मार्ग मोकळा झालाय.
पॅरिसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ISIS चा बिमोड करण्यासाठी फ्रान्सने जर्मनीकडेही मदत मागितली होती. जर्मनी सीरियामध्ये १.२०० सैनिकांची तुकडी पाठविणार आहे. तसेच, लढाऊ विमानेही पाठविली जाणार आहेत. जर्मनीच्या या निर्णयाचे फ्रान्सने स्वागत केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.