लंडन : टीव्हीवर कार्यक्रम पाहून एका १० वर्षीय मुलीनं आपल्या आईची डिलिव्हरी केली, हे ऐकलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, असं इंग्लंडमध्ये घडलंय.
टेलिव्हिजन येणाऱ्या 'वन बेबी एव्हरी मिनिट' हा कार्यक्रम घरात बंदी असूनही ट्रिनिटी कली ही १० वर्षांची चिमुरडी लपून छपून आपल्या रुममध्ये पाहत होती.
या कार्यक्रमात मुलांच्या जन्माबद्दल माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर केल्यानं, कलीला हा कार्यक्रम पाहण्यासाठी बंदी घातली होती, असं कलीची आई डी कली म्हणतेय.
पण, दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा अचानक कलीच्या आईला प्रसववेदना सुरू झाल्या, तेव्हा लगेचच कुणाच्याही मदतीची वाट न पाहता कलीनं आईच्या प्रसुतीची तयारी केली. यावेळी, डी चा ३४ वर्षीय पती टॅरी तिला हॉस्पीटलमध्ये हलवण्यासाठी इकडे तिकडे फोनाफोनी करत होता.
काही मिनिटांमध्येच कलीनं आपल्या बहिणीला या जगात येण्यासाठी मदत केली आणि डीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.
आता चार मुलांची आई बनलेल्या डीला आपल्या चिमुरड्या कलीचा अभिमान वाटतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.