सेक्स स्लेव्ह होऊ नये म्हणून तीने घेतले स्वतःला जाळून..

दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या क्रूरतेचा आणखी नमुना समोर आला आहे. आयसीसच्या छळापासून वाचण्यासाठी एका याझिदी वंशाच्या मुलीने स्वतःला जाळून घेतल्याची ही घटना आहे. ही मुलगी केवळ आठ वर्षांची आहे. 

Updated: Feb 29, 2016, 05:32 PM IST
सेक्स स्लेव्ह होऊ नये म्हणून तीने घेतले स्वतःला जाळून.. title=

जिनेव्हा : दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या क्रूरतेचा आणखी नमुना समोर आला आहे. आयसीसच्या छळापासून वाचण्यासाठी एका याझिदी वंशाच्या मुलीने स्वतःला जाळून घेतल्याची ही घटना आहे. ही मुलगी केवळ आठ वर्षांची आहे. 

चंगूल भागातून या मुलीची सुटका झाली आहे. सुटका झाल्यावर तिने सांगितले की दहशतवाद्यांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठीच तिने हे कृत्य केले आहे जेणे करून हे दहशतवादी तिच्या कुरुप चेहऱ्याकडे पाहणार नाहीत आणि तिच्यावर अत्याचार होणार नाहीत. 

आयसिस दहशतवाद्यांच्या ताब्यात असताना या मुलीची अनेक वेळा विक्री करण्यात आली. तिच्यावर अनेक वेळा बलात्कारही केला गेला. एक दिवस या मुलीला पुन्हा एकदा दहशतवादी आपल्यावर अत्याचार करण्यासाठी आल्याचे स्वप्न पडले. त्यामुळे ती घाबरुन गेली आणि तिने स्वतःला पेटवून घेतले. 

या मुलीला सध्या स्वीत्झर्लंडमाधील जिनेव्हा येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथेच तिची मानसिक स्थितीही सुधारण्याचे प्रयत्न केले जात आहेत.