अफगाण्यांची तालिबानी वृत्ती, १९ वर्षीय तरुणीची दगडानं ठेचून हत्या

सध्या एक व्हिडिओ फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर वायरल झालाय. हा खूप धक्कादायक व्हिडिओ आहे. यात अफगाणिस्तानच्या एका गावात १९ वर्षीय तरुणीला असंख्य लोकांनी दगडानं ठेचून तिची हत्या केलीय.

Updated: Nov 5, 2015, 12:38 PM IST
अफगाण्यांची तालिबानी वृत्ती, १९ वर्षीय तरुणीची दगडानं ठेचून हत्या title=

फिरोझोक, अफगाणिस्तान: सध्या एक व्हिडिओ फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर वायरल झालाय. हा खूप धक्कादायक व्हिडिओ आहे. यात अफगाणिस्तानच्या एका गावात १९ वर्षीय तरुणीला असंख्य लोकांनी दगडानं ठेचून तिची हत्या केलीय.

रिपोर्टनुसार तरुणीचं नाव रुख्साना होतं... तिला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं असं सांगण्यात येतंय. तर मनाविरुद्ध लग्न होतंय म्हणून ती पळून गेल्याचंही कळतंय. या व्हिडिओमध्ये ती एका खड्ड्यात पडलेली दिसते आणि आजूबाजूला जमलेले असंख्य लोकं तिला दगड मारतायेत. ती गयावया करतेय. पण तिच्यावर कुणी दया करत नाही. 

पोलिसांनी ही घटना घडली असल्याचा दुजोरा दिलाय. यापूर्वी विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री-पुरुषाला अशाप्रकारे दगडानं मारण्याच्या घटना घडल्या होत्या. पण ही घटना पहिल्यांदाच घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

पाहा धक्कादायक व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.