ब्रिटन : मी टेरेसा मे आहे पण मी ब्रिटनची होणारी पंतप्रधान थेरेसा मे नाही, किंवा पूर्व गृह सचिव नाही. पण त्यांचे नाव जाहीर झाल्यावर तेरेसा मे हे नाव ट्विटरवर ट्रेंड करते आहे. त्यामुळे मला गेल्या २४ तासात एक हजार जणांनी फॉलो केले असल्याचे नाव साधर्म्य असलेल्या पॉर्न स्टार तेरेसा मे हीने हा खुलासा केला आहे.
टेरेसा मे ब्रिटनची एक ग्लॅमरस मॉडेल आणि अॅडल्ट स्टार आहे. या मॉडेलला सोशल मीडियावर अनेक जणांनी अभिनंदनाचे मेसेज पाठवले, त्यावेळी तिला धक्काच बसला. बुधवारी घोषणा झाली, थेरेसा मे या ब्रिटनच्या पीएम होणार आहेत, त्यामुळे ट्विटरवर त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली.
एका ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले की काही लोकांना मी माजी गृह सचिव वाटली. मग शेवटी मॉडेलला सांगावे लागले की ती मी नव्हे... मॉडेल टेरेसा मे आणि ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान टेरेसा मे यांचे नाव खूप मिळतं जुळतं आहे. त्यामुळे लोक कन्फ्युज होत आहेत.
I find it quite amusing how many people think I'm #TheresaMay the Prime Minister. Just shows how ignorant some people are.
— Teresa May (@RealTeresaMay) July 11, 2016