ग्लासगो : ब्रिटनच्या ग्लासगोमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीनं 'जन्नत' मिळवण्यासाठी दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'ची (ISIS) वाट धरलीय. 'आयएसआयएस'च्या एका दहशतवाद्यासोबत लग्न करण्यासाठी या तरुणीनं आपलं घर सोडलंय.
अक्सा महमूद असं या मुलीचं नाव असून नोव्हेंबर 2013 मध्ये तुर्कीच्या मार्गानं ती सीरियात पोहचलीय. आपली मुलगी 'जिहादी दुल्हन' बनण्यासाठी आयएसआयएसमध्ये सहभागी झाल्याचं कळल्यानंतर तिच्या आई-वडिलांना मात्र जबर धक्का बसलाय. तिच्या आईला तर आपले अश्रू आवरणंही कठिण जातंय.
'आमचं संबंध उदारमतवादी मुस्ली कुटुंबाशी आहे. अक्साचं पालन-पोषणही याच पद्धतीनं झालंय. दहशतवाद्याशी लग्न ही आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे' असं तरुणीचे वडील मुजफ्फर महमूद यांनी म्हटलंय.
अक्सानं आपल्या आई-वडिलांना संदेश धाडलाय. यात ती म्हणते, मी तुम्हाला 'कयामत'च्या दिवशी भेटेल... मी तुमचा हात पकडून तुम्हाला 'जन्नत'मध्ये घेऊन जाईन... मी तुम्हाला 'शहादत' मिळवून देऊ इच्छिते'...
आपल्या मुलीपर्यंत आपला संदेश पोहचावा यासाठी अक्साच्या आईनं एक संदेश रेकॉर्ड केलाय. 'माझ्या प्रिय मुली घरी परत ये... तुझी खूप आठवण येतेय... तुझ्या भाऊ-बहिणींना तुझी उणीव भासतेय'. हा संदेश ऐकून अक्सा आपल्याला परत मिळेल, अशी भाबडी आशा या आईला आहे.
महत्त्वाचं म्हणजे, इराक आणि सीरियामध्ये जिहाद्यांना साथ देणारी अक्सा एकटी मुलगी नाही. अक्सासारख्याच ब्रिटनच्या 60 तरुणींनी 'जन्नत' मिळवण्यासाठी हेच पाऊल उचललंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.