नळातून आले सोने, पण रहिवाशांना आश्चर्य नाही

आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 9, 2014, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.
अमेरिकेतील मोनटाना येथील व्हाईटहॉल येथील रहिवाशांना काळजी आहे की, पिण्याच्या पाण्यात अशा प्रकारे सोने आढळू नये.
घरातील भांडे धुतांना मार्क ब्राऊन यांच्या पत्नीला सोन्याचे कण आढळल्याचे ब्राऊन यांनी एनबीसी न्यूजच्या पत्रकाराला सांगितले. पाण्याचा नळ सुरू केल्यावर काही तरी चमकणारी वस्तू कणाच्या रुपाने पाण्यासोबत आली. या पाण्यातून येणाऱ्या कणामुळे ते उत्साहीत झाले नाही, उलट त्यांनी असा प्रकार का होतो याची चिंता व्यक्त केली.
पाण्यात अशाप्रकारचे जड धातू आपल्याला पाहायला मिळतात. तर न दिसणारे धातूही असतील अशी शंका ब्राऊन यांनी व्यक्त केली.
जवळ असलेल्या सोन्याच्या खाणीतून हे कण येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण अधिकाऱ्यांनी याला नकार दिला. जवळच्या पाईपमधून अशा प्रकारे धातू येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पाहा कसे येते नळातून सोने – व्हिडिओ पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.