आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज ग्रीसने बुडवलं

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज बुडवणारा ग्रीस हा पहिला प्रगत देश बनलाय. ३० जूनला मध्यरात्रीपर्यंत १.६ अब्ज युरोंचं कर्ज ग्रीसनं परत करणं अपेक्षित होतं. पण सरकारकडे रोकड नसल्यानं ग्रीसला हे कर्ज परत करता येणार नाही, असं काल संध्याकाळी ग्रीसनं स्पष्ट केलं. 

Reuters | Updated: Jul 1, 2015, 11:53 AM IST
आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज ग्रीसने बुडवलं title=

लंडन : आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज बुडवणारा ग्रीस हा पहिला प्रगत देश बनलाय. ३० जूनला मध्यरात्रीपर्यंत १.६ अब्ज युरोंचं कर्ज ग्रीसनं परत करणं अपेक्षित होतं. पण सरकारकडे रोकड नसल्यानं ग्रीसला हे कर्ज परत करता येणार नाही, असं काल संध्याकाळी ग्रीसनं स्पष्ट केलं. 

त्याशिवाय युरोपियन युनियनच्या १९ देशांसमोर ग्रीसनं दोन वर्षांसाठी कर्जाची पुनर्रचना करण्याचा नवा प्रस्तावही ठेवलाय. त्यावर आज ब्रसेल्समध्ये चर्चा होईल. त्यात सर्व १९ देशांचे अर्थमंत्री सहभागी होतील असं बोललं जातंय. 

कर्ज देण्याआधी युरोपियन युनियननं खर्चकपातीच्या अटींची जाचकता कमी करावी अशी ग्रीसची मागणी आहे. पण युरोपियन युनियनमधले कर्जदाते आता ग्रीसचं काही ऐकायला तयार नाही. त्यामुळे या युरोझोनमधल्या राष्ट्रांकडून कर्ज घ्यायचं की नाही, यावर ग्रीसच्या सरकारनं रविवारी देशात सार्वमत घेण्याचा निर्णय घेतलाय.

जर ग्रीसनं दिलेला नवा प्रस्ताव युरोझोनच्या देशांनी मान्य केला, तर सार्वमत घेणार नाही असंही ग्रीसनं काल म्हटलंय. त्यामुळे आता आधीच दिवाळखोर झालेल्या ग्रीसला सावरण्यासाठी युरोझोनचे देश आणखी दोन वर्ष पतपुरवठा सुरू ठेवतात का? याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.