पॅरिस - दहशतवादी हल्ल्यानंतर पॅरिसच्या उत्तर भागात सुरु केलेल्या दहशवादविरोधी कारवाईदरम्यान दोन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. या महिलेने विस्फोटकांच्या सहाय्याने स्वत:ला उडवून घेतले. यादरम्यान, तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
फ्रान्सची राजधानी पॅरिसवर झालेल्या १३/११ हल्ल्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे घातले होते. डेनिस परिसरात घालण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान काही पोलीस अधिकारी जखमी झाले. एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी अद्यापही इमारतीत लपून आहेत.
आणखी वाचा - आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!
पाच दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२९ निरपराध लोकांना जीव गमवावा लागला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.