पाच वर्षे काही न खाता-पिता तो जिवंत!

तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 30, 2013, 02:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलंबो
तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते. पण श्रीलंकेतल्या एका महाभागानं चक्क पाच वर्षे अन्न-पाण्यावाचून काढली आहेत.
आश्चर्याचा धक्काच बसला असेल ना? पण हा माणूस कोणताही साधू वगैरे नाही. लेनेरोल असे या व्यक्तीचे नाव आहे आणि तो श्रीलंकेतील नागरिक आहे. लेनेरोलचे असं म्हणणं आहे की, ‘मला फक्त ताज्या हवेची गरज लागते. श्वासोच्छवास, हवा आणि प्रकाशाच्या बळावर जिवंत ठेवणारी दिनचर्या मला वयाच्या बाबतीत नक्कीच अमर करु शकते’. गेली पाच वर्ष तो या दिनचर्येचं पालन करतोय.

याआधी त्याने तीन महिने पाण्यावर राहून एक मॅरेथॉन ही पूर्ण केली होती. ‘या दिनचर्येनंच मला उद्योगी बनवलंय’ असं लेनेरोलचं म्हणणं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.