न्यू यॉर्क: हृदयाचे ठोके बंद पडण्यावर प्रभावी इलाज लवकरच अस्तित्वात येऊ शकणार आहे. संशोधकांनी अशा अणूचा शोध केला आहे, जो हृदयघातासाठी कारणीभूत ठऱणाऱ्या प्रोटीनच्या हालचालींवर लगाम ठेवतो.
नुकतेच शोधण्यात आलेला ‘मायहार्ट’ नामक नॉन कोडिंग आरएनए हृदयात असलेल्या बीआरजी1 नामक प्रोटीनच्या हालचालींवर लगाम ठेवतो, हे प्रोटीन तणावाच्यावेळी सक्रिय होतो.
अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये मेडिसीनच्या एसोसिएट प्रोफेसर चिंग-पीन चांग यांनी सांगितले की, मला वाटते, मायहार्ट (मायोसिन हेवी-चेन-एसोसिएटेडआरएनए ट्रांसक्रिप्ट) बीआरजी1 प्रोटीन तयार करणाऱ्या डीएनएला निष्क्रिय करतात. यामुळे हृदयाच्या कार्यशैलीवर प्रभावीत करणाऱ्या प्रोटीन (बीआरजी1) बनू शकत नाही आणि त्याने हृदयाला कोणतेही नुकसान होत नाही.
एखाद्या वयस्कर मनुष्याच्या हृदयात तणाव निर्माण होतो त्यावेळी त्याचे ब्लड प्रेशर वाढते किंवा हार्ट अॅटकमुळे नुकसान होते. त्यावेळी बीआरजी1 प्रोटीन सक्रिय होते. आणि हृदयाच्या कार्यशैलावर प्रभाव पडतो. त्यामुळे हृदयगती थांबून जाते.
हार्ट फेल होण्यापासून रोकण्यासाठी मायहार्ट अणू हा योग्य स्तर कायम राखतो. आणि प्रोटीन बनणे थांबते.
हे अध्ययन नेचर मासिकाच्या ऑनलाइन एडिशनमध्ये प्रकाशित झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.