काश्मिरमध्ये चीनची घुसखोरी

चीनची घुसखोरी सुरूच आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये चीनने खुसखोरी करीत दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही घुसखोरी भारताची डोकेदुखी झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2013, 09:53 AM IST

www.24taas.com, जिनिव्हा
चीनची घुसखोरी सुरूच आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये चीनने खुसखोरी करीत दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही घुसखोरी भारताची डोकेदुखी झाली आहे.
काश्मिरच्या काही भागासह गिलगिट बाल्टिस्तानसह अक्साईमध्ये चीनने घुसखोरी केल्याची माहिती एका काश्मिरी नेत्याने दिलेय. काश्मिर नॅशनल पार्टीच्या राजनैतिक समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते डॉ. शबीर चौधरी यांनी चीनने जम्मू-कश्मीरच्या काही भागात घुसखोरी केल्याचे मुलाखतीत सांगितले.
चीनने जरी काश्मिरात घुसखोरी केली असली तरी कोणत्याही वादात चीनचा समावेश नाही. मात्र पाकिस्तान आणि पाकवादी काश्मिरी चीनला वादात सहभागी करून घेत आहेत. ही घातक बाब असल्याचे चौधरी म्हणाले. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी आवश्यक मौल्यवान धातू आणि दगड शोधण्यासाठी चीनने या परिसरात उत्खनन सुरू केल्याचे वृत्त आहे.