हिंदू मुलीचं अपहरण करून धर्मांतर, हिंदूंचं संतप्त आंदोलन

पाकिस्तानातील सिंधमध्ये एका हिंदू युवतीचं धर्मांतर करून तिला मुस्लिम केल्याबद्दल आणि तिचा मुस्लिम तरूणाशी विवाह लावून दिल्याबद्दल तेथील अल्पसंख्यांक हिंदूंनी जोरदार आंदोलन केलं आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, की हिंदू तरुणीचं अपहरण करून तिला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 31, 2013, 04:28 PM IST

www.24taas.com, जेकबाबाद
पाकिस्तानातील सिंधमध्ये एका हिंदू युवतीचं धर्मांतर करून तिला मुस्लिम केल्याबद्दल आणि तिचा मुस्लिम तरूणाशी विवाह लावून दिल्याबद्दल तेथील अल्पसंख्यांक हिंदूंनी जोरदार आंदोलन केलं आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, की हिंदू तरुणीचं अपहरण करून तिला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आलं आहे.
हिंदुंमधील या संतापामुळे पाकिस्तानातील जेकबाबादमध्ये शुक्रवारी होणाऱ्या हिंदू पंचायतीच्या निवडणुका रद्द कराव्या लागल्या. जेकबाबादमधील झानहरी जिल्ह्यातील सोन्याचे व्य़ापारी असणाऱ्या अशोक कुमार यांची मुलगी गंगा हिला बहादुर अली सुरहियो या सोनाराच्या मुलाने असिफ अली याने पळवून नेऊन अमरोत शरीफ दर्ग्यावर तिच्याशी लग्न केलं. या आधी गंगाचं धर्मांतर करुन तिचं नाव असिया ठेवण्यात आलं.

जेव्हा मुलीच्या अपहरणाची बातमी मुलीच्या आई-वडिलांना कळली, तेव्हा ते दर्ग्यावर पोहोचलं. पण, तोपर्यंत तिचं धर्मांतर केलं गेलं होतं आणि लग्नही. या नंतर गंगाच्या आई वडिलांनी पोलिसांत असिफ अली, त्याचे वडील, त्याचा भाऊ आबिद अली तसंच त्यांच्या परिवारातील मिरान बख्क्ष यांच्याविरोधात अपहरणाची तक्रार केली. त्यावरून असिफच्या वडिलांना आणि मिरान यांना अटक केलं. असिफ चा शोध पोलीस घेत आहेत.