www.24taas.com झी मीडिया, इस्लामाबाद
मुंबई आणि दिल्ली हल्ल्यातील अतिरेकी हाफिज मोहम्मद सईद याने भारताला खुले आव्हान दिले आहे. मी दहशतवादी आहे, हे भारताने सिद्ध करून दाखवावे, असं हाफिजने म्हटलं आहे. पाकिस्तान आणि भारताच्या न्यायधीशांकडून स्वतंत्र्य चौकशी केली जावी. मी दहशतवादी आहे हे सिध्द करावे, हे सईद आव्हान देताना सांगितलं.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ यामध्ये सईदच्या नावे एक लेख आला आहे. त्यात त्याने असे सांगितले आहे की, तुम्ही (भारत) मला दहशतवादी म्हणत आला आहात. पण मी दहशतवादी नाही. जर हे तुम्हाला पटत नसेल तर पाकिस्तान आणि भारताचा एक वरिष्ठ वकील अथवा न्यायाधीश यांचे एक न्यायालय भरवा. अथवा एक चौकशी आयोग नेमा. या दोन्हीपैकी एकाने तरी मी दहशतवादी आहे, हे स्पष्ट करावे. जर आयोगाच्या चौकशी दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले तर ते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे बुधवारी १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाहोरमध्ये झालेल्या एका बैठकीत सईदने असं म्हटलयं.
पाकिस्तानने सईदला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी भारताची मागणी होती. याविषयी बोलतांना तो म्हणाला की, भारत माझ्यासाठी खूप अस्वस्थ झाला आहे, तर काही काळजी करू नका आता मी स्वतः भारतात येणार आहे. पाकिस्ताने सईदला भारताकडे सोपवून द्यावे, यासाठी जम्मू-काश्मीरवर गोळीबार केलाय. हा सईदचा कांगावा या वृत्तात दिसून येत आहे.
भारत पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर दबाव टाकत आहे. आम्ही भारतासोबत मैत्री करायला तयार आहोत, पण भारताने जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवर गोळीबार करणं आधी बंद करावं, त्या लोकांना मारणं थांबवावं. बलूचिस्तानच्याबाबतीत हस्तक्षेप करू नये. पाकिस्तानमध्ये पूराचं पाणी सोडू नये, अशा काही मागण्या हाफिजने केल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.