close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास

 'द संडे टाईम्स' या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलीये. यात यू.के.मधले बसिमॉन आणि डेव्हिड रुबेन सर्वात श्रीमंत ठरलेत. रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे, हे विशेष. त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते. 

Updated: Apr 25, 2016, 10:42 AM IST
भारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास

लंडन :  'द संडे टाईम्स' या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलीये. यात यू.के.मधले बसिमॉन आणि डेव्हिड रुबेन सर्वात श्रीमंत ठरलेत. रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे, हे विशेष. त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते. 

1950 साली ते लंडनला स्थलांतरित झाले. धातू व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्रात असलेल्या रुबेन बंधूंची संपत्ती आजमितीस 13.1 अब्ज पाऊंड्स इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारतीय वंशाचे हिंदुजा बंधू आहेत. श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा यांनी आपलं दुसरं स्थान कायम ठेवलंय. 

स्टीलमॅन लक्ष्मी मित्तल यांची मात्र घसरण झालीये. गतवर्षी या यादीत अव्वल स्थानी असलेले मित्तल आता 11व्या स्थानावर फेकले गेलेत. त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 20 अब्ज डॉलर्सची घसरण झालीये.