या देशांत भारतीय चलन रुपया मोठा

जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया सबसे बडा भैया आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.

Reuters | Updated: Jul 8, 2016, 05:15 PM IST
या देशांत भारतीय चलन रुपया मोठा title=

मुंबई : जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया सबसे बडा भैया आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.

तुम्ही आफ्रिका खंडातील झिम्बाब्वे या देशाच्या सफरीवर जात असाल तर ते तुमच्यासाठी फायदाचे ठरते. कारण १ रुपया म्हणजे ५.८८ झिम्बाब्वे डॉलर. त्यामुळे परदेश पर्यटन करताना ते फायद्याचे ठरते. येथील जंगलाची सफर करुन मोठे हत्ती, जिराफ पाहू शकता.

व्हिएतनाममध्येही भारतीय रुपया मोठा आहे. येथे १ रुपया म्हणजे ३४१ डॉन्ग. येथे पर्यटनासाठी सुंदर डोंगर पाहू शकता. तसेच नदीमध्ये बोट राईट करु शकता. हा क्षण तुमच्यासाठी अवर्णीय असेल.

भारताचा शेजारी देश श्रीलंका. या देशात रुपया भारी आहे. १ रुपया म्हणजे २.१४ श्रीलंकन रुपया होय. श्रीलंका बेट असल्याने येथील समुद्राचा आनंद लूट शकता. निर्सग रचना चांगली असून रामायणाशी संबंधी काही जुने अवशेष येथे पाहायला मिळतात. तुम्ही १०००मध्ये रेंटवर हॉटेलमध्ये राहू शकता.

जपान या देशातही रुपया मोठा आहे. १ रुपया म्हणजे १.८१ येन. जपानवर दोन आण्विक हल्ले (अणू बॉम्ब) झालेत. तसेच भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळख आहे. या देशात तुम्ही पर्यटन करु शकता. पण व्हिसा ऑन आगमन सुविधा येथे उपलब्ध नाही.

इंडोनेशिया हा प्राचीन काळापासून भारताचा जवळचा मित्र राहिला आहे. येथेही भारतीय रुपया मोठा आहे. १ रुपया बरोबर इंडोनेशिया २१५ रुपैया होय. इंडोनेशियाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथे जावा आणि बाली लोकल कल्चर जाणून घेण्यासाठी चांगले ठिणान आहे.

युरोपीन देशांपैकी एक हंगेरी. या देशात रुपया मजबूत आहे. १ रुपया म्हणजे ४.१२ फोरिंट होय. या ठिकाणी उंच इमारती आहेत. तसेच हंगेरी मध्ये निर्वासितांचे पुनर्वसन केले गेले आहे. येथील कॅसल्स हंगेरी वर्ल्ड प्रसिद्ध आहे.

पॅराग्वे हा जगातील सर्वात स्वस्त देश आहे. भारतीय रुपयाला येथे डॉलरप्रमाणे स्थान आहे. १ रुपया म्हणजे ८४.३७ गुआरनी होय. येथील लॅडस्केप, वॉटरफॉल आणि रिवट राफ्टिंगचा आनंद लूट शकता.

कॉस्टा रिका हा दक्षिण अमेरिकन देश आहे. येथेही रुपया चलन मोठे आहे. १ रुपया म्हणजे ८.१५ कोलोन्स होय. येथील समुद्र ठिकाणे तुम्हाला मोहात पाडतील. त्यामुळे फिरण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.

दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया हा सुंदर देश आहे. येथील लॅन्डस्केप पाहण्यासारखा आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी  भारतीय पर्यटकांना व्हिसाची गरज नाही. येथे १ रुपया म्हणजे ०.११ बोलिव्हियानो होय.

युरोपातील बेलारुस या देशात तुम्ही कमी पैशात सफर करु शकतात. परदेशातील नंदनवन येथे पाहू शकता. येथील आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. बेलारुसमध्ये रुपया मजबूत आहे. १ रुपया म्हणजे २६८ बलारुसी रुबल होय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.