www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क, नवी दिल्ली
भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.
डॉ. देवयानीयांची पोलिसांनी कपडे उतरवून चौकशी केली. यामुळे अमेरिकेत भारतीय नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीचे चित्र पुढे आलेय. हा प्रकार उघडकीस येताच केंद्राने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान, या प्रकरणी नाराजी व्यक्त करत भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाची लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी भेट नाकारली.
व्हिसा गैरव्यवहार आणि मानवी तस्करी, असा आरोप ठेवत डॉ. देवायनी यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करून भररस्त्यात बेड्या ठोकल्या. न्यूयॉर्क पोलिसांनी मॅनहॅटनमधून देवयानी खोब्रागडे यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांची कपडे उतरवून चौकशी करण्यात आली आणि त्यांना सेक्स वर्करबरोबर उभे करण्यात आले.
चौकशीदरम्यान, देवयानी यांना मुद्दाम गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी आणि अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींसोबत उभे केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी अमेरिकन शिष्टमंडळाची भेट नाकारली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.