चार ड्रग्ज माफियांना गोळ्या मारुन मृत्यूदंडाची शिक्षा

इंडोनेशियामध्ये चार ड्रग्ज माफियांना थेट गोळ्या मारुन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. 

PTI | Updated: Jul 29, 2016, 06:31 PM IST
चार ड्रग्ज माफियांना गोळ्या मारुन मृत्यूदंडाची शिक्षा title=

जकार्ता : इंडोनेशियामध्ये चार ड्रग्ज माफियांना थेट गोळ्या मारुन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. 

तीन नायजेरियन आणि एका इंडोनेशियन ड्रग माफियाला कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर त्यांना थेट गोळ्या मारण्यात आल्या. या चौघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण ज्या तुरुंगामध्ये फाशी द्यायची होती, तिथे वादळ होते. त्यामुळे या चौघांनाही थेट गोळ्या घालण्यात आल्या. 

या चौघांसह आणखी दहा ड्रग्जमाफियांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. पण त्यांना नंतरच्या टप्प्यात शिक्षा दिली जाणार आहे. 

इंडोनेशियापुढे ड्र्ग्जशी लढा देण्याचं मोठे आव्हान आहे. त्यासाठी तिथे ड्रग्जतस्करीसाठी कठोरातली कठोर शिक्षा दिली जाते.