'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती

देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे.  

Updated: Nov 7, 2014, 04:34 PM IST
'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती title=

नवी दिल्ली : देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे. डिजिटल, अॅनेलिटिक्स आणि क्लाऊडसहीत इतरही क्षेत्रात यामुळे इन्फोसिसची क्षमता वाढविता येणार आहे. 

अमेरिकेत होणाऱ्या या भरतीमध्ये इन्फोसिसच्या बिझनेसमध्ये वाढ होईल तसंच कंपनीची क्षमताही वाढविण्यास मदत होईल, असं कंपनीनं स्पष्ट केलंय. 

या कर्मचाऱ्यांशी जोडलं गेल्यानं ग्राहकांच्या स्थानिक बाजार संबंधित समज, तांत्रिक कौशल्य आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, १५०० जणांना चालू आर्थिक वर्षांत सल्लामसलत, विक्री, पुरवठा यांसाठी वेगवेगळ्या पदांवर नियुक्त करण्यात येईल... तसंच त्यापुढील १२ महिन्यांत अमेरिकन विश्वविद्यालयांतील जवळपास ६०० पदवीधर आणि पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियुक्त केलं जाईल. 

इन्फोसिस अमेरिकन विश्वविद्यालयांतील जवळपास ३०० मॅनेजमेंट आणि पदव्यूत्तर विद्यार्थ्यांची नियुक्ती करेल जे डिजिटल, अॅनेलिटिक्स आणि क्लाऊडसहीत इतर क्षेत्रांत काम सांभाळतील. 

सध्या, इन्फोसिसमध्ये १.६५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत आणि या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैंकी ६०.८ टक्के उत्पन्न उत्तर अमेरिकेतून मिळालंय. सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेल्या कंपनीच्या तिमाही कंपनीचं उत्पन्न १३,३४२ करोड आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.