मॉस्को : रशियाच्या एका प्रसिद्ध पॉर्न स्टारवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना समोर आलीय. एका सिनेमावर चर्चा करण्याच्या निमित्तानं या पॉर्न स्टारला आरोपींनी बोलावून घेतलं होतं.
काहीही कल्पना नसताना ही पॉर्न स्टार घरात दाखल झाल्यानंतर आरोपींनी तिच्यावर अनेक तास बलात्कार केला. तिनं विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जबर मारहाणही करण्यात आली. यापासून वाचण्यासाठी संबंधित मुलीनं तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या अपघातात तिचे दोन्हीही पाय निकामी झालेत.
वेबसाईट 'डेलीमेल डॉट को डॉट यूके'नं दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोच्या यासेनोव या भागात २२ वर्षीय पॉर्न स्टार लोटा टेलर एका व्यक्तीला जखमी अवस्थेत सापडली. यावेळी लोला हिचे कपडेही फाटले होते.
पॉर्न स्टारनं तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरातून उडी मारल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली होती. यावेळी, जवळूनच जाणाऱ्या ब्लेसियस विनोग्रादोव या ५४ वर्षीय गृहस्थानं तिला पाहिलं. ब्लेसियस त्यावेळी आपल्या कुत्र्यासोबत बाहेर फिरायला निघाले होते. यावेळी, लोलाच्या तोंडातून रक्त येत होतं. तिचे कपडेही फाटले होते आणि तिच्या पायांना गंभीर दुखापत झाली होती. परिस्थितीचं भान ठेवून ब्लेसियस यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोला गंभीर अवस्थेत सापडली होती. खाली उडी मारण्यापूर्वी तिच्यावर अनेक तास सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीय. दमित्रि कोसेनकोव (३०) आणि मॅकसिम पिलिपेंको (३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांना ३० वर्षांची शिक्षा होऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.