मुंबई : झुगरबर्ग याने खूप हुशारीने आपल्या फेसबूकच्या नव्या प्रोजेक्टला या माध्यमातून प्रमोट केले आहे. त्याचे नाव आहे. internet.org यात ६ कंपन्या सामील आहेत. त्यात सॅमसंग, एरिक्सन, मीडिया टेक, ओपेरा सॉफ्टवेअर, नोकिया आणि क्वालकॉम यांनी internet.org माध्यमातून विकसनशील देशात मोफत इंटरनेट देण्याचे ठरविले आहे.
अधिक वाचा : तिरंग्यातील फेसबूक प्रोफाइल मागील घाणेरडं सत्य
तुम्हांला खूप चांगल वाटत असेल की एखादा व्यक्ती भारताच्या दुर्गम खेड्यात डिजीटलाझेशनसाठी मदत करीत आहे. पण हा इंटरनेटच्या स्वातंत्र्यावर आणि नेट न्युट्रॅलिटीवर घाला आहे. डिजीटल इंडियाच्या पाठीवर बसून भारतात घुसण्याचा आणि internet.org माध्यमातून ग्रामीम भागात मोफत इंटरनेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. सत्यात internet.org ची अमंलबजावणी झाली तर भारतासारख्या देशाला फायदा सोडून सर्व काही होणार आहे.
फ्री इंटरनेट फक्त रिलायन्स युजर्सला मिळणार आहे. फेसबूकने रिलायन्सशी भागिदारी केली आहे. त्यानुसार फक्त फेसबूक आणि ५० वेबसाइट्सला फ्री इंटरनेट मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा इतरांना होणार नाही. म्हणजे तुम्हांला याचं गाजर दाखविण्यात येणार आहे. सर्वांना फुकटंच इंटरनेट आवडणार आहे. त्यामुळे युजर्स ज्या साईट फ्रीमध्ये मिळणार त्यावरच जाणार इतरांच्या बाजार उठण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रकारामुळे एक प्रकारची मक्तेदारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेसबूक आणि ५० साइट या इंटरनेट जगावर अधिराज्य गाजवतील. छोट्या कंपन्यांनी इंटरनेट विश्वात टिकून राहण्याचा विचारही करू शकत नाही.
तिरंग्यातील फेसबूक प्रोफाइल मागील घाणेरडं सत्य
आज आपण सर्वांनी पाहिलं की फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने आपले प्रोफाइल पिक्चर तिरंग्यात केले आणि म्हटले की तो मोदी यांच्या डिजिटल इंडिया कॅम्पेनला पाठिंबा देत आहे. आपण भारतीयांनी त्याला आंधळेपणाने फॉलो केलं पण त्या मागील घाणेरडं सत्य जर तुम्हांला माहीत झालं तर तुम्ही झुगरबर्गला शिव्यांची लाखोली वाहाल.
fb.com/supportdigitalindia टाइप करून तुमच्यापैकी अनेकांनी आपलं प्रोफाइल पिक्चर बदललं असेल, तुम्हांला वाटत असेल की तुम्ही डिजीटल इंडियाला सपोर्ट केला. पण तसं नाही आहे.
अशा प्रकारे तुमचे प्रोफाइल पिक्चर बदलणे म्हणजे तुम्ही नेट न्युट्रॅलिटीच्या विरोधात आपोआप मतदान करणे आहे. नेट न्युट्रॅलिटीवरून काही दिवसांपूर्वी खूप मोठे वादळ उठलं होतं. त्यातून अनेकांनी नेट न्युट्रॅलिटी हवी असा सूर काढला होता. पण झुगरबर्ग या माध्यमातून इंटरनेट डॉट ओआरजी (internet.org)ला पाठिंबा मिळणार आहे. हे नेट न्युट्रॅलिटीच्या विरोधात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.