नवी दिल्ली : २८ आणि २९ सप्टेंबर यामधील रात्र पाकिस्तानसाठी काळी रात्र होती. पाकिस्तानवर दोन्ही बाजूंकडून हल्ला करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून ३८ दहशतवादी ठार केले तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणने मोर्टर हल्ला केला.
ईराणच्या बॉर्डर गार्ड्सने सीमापार कारवाई करत बलुचिस्तानने तीन मोर्टर फायर केले. ही घटना पंजगूर जिल्ह्यात झाली. फायरिंगनंतर या भागात दहशतीची वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानचे वृत्तपत्र 'डॉन'नुसार ईराणने दोन बॉम्बगोळे फ्रंटिअर कोरच्या चेकपोस्टजवळ पडले. तर तिसरा किल्ली करीम येथे फायर करण्यात आला.
या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. पण या घटनेनंतर इराण पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे.
पाक इराणमध्ये ९०० किलोमीटरची सीमा आहे. दोन्ही देश एकमेकांवर फायरिंगचे आरोप करण्यात येता. दोघांमध्ये दहशतवाद विरोधात २०१४ मध्ये सामंजस्य करार झाला होता.