इराकमधील 46 नर्स सुरक्षित, सरकारचा दावा

 इराकमध्ये अडकून पडलेल्या ४६ भारतीय नर्सचा सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच सष्ट झाले आहे. 'आयएसआयएस' या दहशतवाद्यांच्या संघटनेने सर्व नर्सना अज्ञातस्थळी हलविले आहे. या ठिकाणी बॉम्बवर्षाव होत असून काही नर्स जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर सरकारकडून त्या सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

PTI | Updated: Jul 4, 2014, 09:27 AM IST
इराकमधील 46 नर्स सुरक्षित, सरकारचा दावा title=

नवी दिल्ली : इराकमध्ये अडकून पडलेल्या ४६ भारतीय नर्सचा सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच सष्ट झाले आहे. 'आयएसआयएस' या दहशतवाद्यांच्या संघटनेने सर्व नर्सना अज्ञातस्थळी हलविले आहे. या ठिकाणी बॉम्बवर्षाव होत असून काही नर्स जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर सरकारकडून त्या सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

इराकमधील तिकरीत शहरातील वस्त्यांमधून नर्सना अज्ञातस्थळी नेत असताना झालेल्या हल्ल्यांमध्ये काही परिचारिका किरकोळ जखमी झाल्या आहेत.
भारतीय परिचारिका असलेला इराकमधील हा भाग सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. तसेच अनेक प्रयत्न करूनही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीदेखील दुर्दैवी परिचारिकांशी थेट संपर्क साधू शकलेले नाहीत.

इराकमधील राजदूतावास या परिचारिकांचा संपर्क होत असल्याचे म्हटले आहे आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असताना त्या 'सुरक्षित' आहेत, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने दिली.

तिकरीत येथील रुग्णालयामधून या परिचारिकांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले. मात्र त्यांना स्वखुशीने नव्हे तर सक्तीने अन्यत्र हलविले गेल्याचे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले. बिघडलेल्या परिस्थिमुळे संरक्षणार्थ परिस्थितीचे आदेश पाळावेच लागतात. त्यामुळेच त्यांना दुसरीकडे हलविले आहे, अशा शब्दांत परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेय.

इराकमध्ये रण पेटलेल्या भागात सुमारे १०० भारतीय व्यक्ती अडकून पडल्या आहेत. मात्र त्यांचा नेमका आकडा सांगणे कठीण आहे. ४६ भारतीय परिचारिका आणि ३९ अन्य भारतीयांचा गट सध्या दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.