मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. जगातील शक्तिशाली व्यक्ती म्हणून नव्हे तर वेगळ्याच कारणांसाठी ही चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यांबद्दल सोशल मीडियावर बातमी व्हायरल होते. मिळालेल्या वृत्तानुसांर, शक्तिशाली राष्ट्रपती पुतिन ५०० वर्षांपासून जिवंत आहेत. याबाबत सोशल मीडियावर फोटोही व्हायरल झालेत. या पोस्टमध्ये पुतिन यांची तुलना कधी मोनालिसा यांच्या चित्राशी तर रशियन सैनिकांशी केली जातेय.
सोशल मीडियावर विविध सालांतील फोटो पोस्ट करण्यात आलेत. यातील व्यक्तींचे चेहरे हे पुतिन यांच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते आहेत. यातील काही फोटोंमध्ये तर पुतिन यांचा चेहऱा आणि मोनालिसाच्या चित्रात साम्य असल्याचा दावा केला जातो.
इतकेच नव्हे तर १९२० आणि १९४१मधील रशियन सैनिकांचा चेहराही पुतिन यांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. दरम्यान, फोटोशॉपमधून हे सर्व फोटो एडिट केल्याचा दावा अनेक नेटकऱ्यांनी केलाय.
व्लादिमीर पुतिन २००० पासून सत्तेवर आहेत. २००० ते २००८ दरम्यान ते राष्ट्रपती होते. २००८ ते २०१२ दरम्यान ते रशियाचे पंतप्रधान होते. २०१२ मध्ये ते पुन्हा राष्ट्रपतीपदी विराजमान झाले.