इसिसमध्ये येण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन

दहशतवाद्यांना इसिसमध्ये येणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी संघटनेने एक ऑनलाईन मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. सीरिया आणि इराकमध्ये हिंसाचाराचे थैमान घातलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने दहशतवाद्यांच्या भरतीसाठीची मोहिम अधिक तीव्र केली आहे.

Updated: Feb 12, 2015, 05:59 PM IST
इसिसमध्ये येण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन title=

वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना इसिसमध्ये येणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी संघटनेने एक ऑनलाईन मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. सीरिया आणि इराकमध्ये हिंसाचाराचे थैमान घातलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने दहशतवाद्यांच्या भरतीसाठीची मोहिम अधिक तीव्र केली आहे.

या नव्या प्रयत्नाद्वारे इसिसने विशेषत: इंग्रजी भाषा बोलणाऱ्या तरुणांना आकर्षित करण्याचे ध्येय ठेवले आहे. सीरियामध्ये येऊन इसिसतर्फे लढण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी संघटनेने ही तब्बल 50 पानी पुस्तिका तयार केली आहे. 

या पुस्तिकेमध्ये इतर बाबींखेरीज विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेस गुंगारा देऊन सीरियाच्या सीमारेषा ओलांडण्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. 
 
इसिसतर्फे या तरुणांना खोटी आश्‍वासने देऊन फशी पाडले जात असल्याचे सूत्रांनी सागितले. भारतामध्येही इसिसकडे आकर्षिले जाणारे तरुण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.  अमेरिका आणि जगभरातील तरुणांना इसिसकडे आकर्षित करण्यासाठी संघटनेकडून सोशल मिडीयाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.