सावधान! इसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत : रिपोर्ट

अमेरिकन प्रसारमाध्यमांनी आज इसिसबद्दल एक धक्कादायक माहिती दिलीय. आपल्या क्रूरकृत्यांसाठी चर्चेत असलेली दहशतवादी संघटना इसिसचं आता टार्गेट भारत असल्याचं कळतंय. भारतावर हल्ला करण्यासाठी ते कट रचत असल्याचं अमेरिकन प्रसारमाध्यमांनी सांगितलंय. 

PTI | Updated: Jul 29, 2015, 08:10 PM IST
सावधान! इसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत : रिपोर्ट title=

वॉशिंग्टन: अमेरिकन प्रसारमाध्यमांनी आज इसिसबद्दल एक धक्कादायक माहिती दिलीय. आपल्या क्रूरकृत्यांसाठी चर्चेत असलेली दहशतवादी संघटना इसिसचं आता टार्गेट भारत असल्याचं कळतंय. भारतावर हल्ला करण्यासाठी ते कट रचत असल्याचं अमेरिकन प्रसारमाध्यमांनी सांगितलंय. 

अमेरिकेतील एका वृत्तपत्रानुसार तालिबानशी संबंधीत एका पाकिस्तानी नागरिकाकडून उर्दु भाषेतील ३२ पानी फाईल जप्त करणयात आली आहे. या कागदपत्रांमध्ये इसिसनं आता भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तालिबानी संघटनांनी एकत्र यावं आणि अल कायदा या संघटनेनंही या युद्धात सहभागी व्हावं, असं आवाहन इसिसनं केलंय. इसिसच्या प्रमुखांना जगभरातील मुस्लिमांचे सर्वोच्च नेते म्हणून दर्जा मिळायला हवा, असंही त्यात नमूद करण्यात आलंय. ही सर्वनाशाची लढाई असून अरब जगतातही छोटेछोटे सशस्त्र उठाव व्हायला हवे, असा उल्लेख या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. 

अमेरिकेतील सीआयएच्या अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांना दुजोरा दिला असून यातील भाषा, खुणा यावरुन ही माहिती इसिसची असल्याचं स्पष्ट होतं, असं या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर संबंधीत वृत्तपत्राला सांगितलं. इसिसनं भारताविरोधात युद्ध पुकारल्यास दक्षिण आशियातील शांततेला धोका निर्माण होईल अशी भीतीही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.