सीरिया : तुर्कीमध्ये लढाऊ विमान पाडल्यानंतर ISISचा दहशतवादी या विमानाचे व्हिडिओ शुटींग करत होता. त्याचवेळी डागण्यात आलेल्या मिसाईलच्या स्फोटात तो ठार झाला.
रशियाकडून तुर्कीमध्ये ISISच्या दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ले चालू आहे. पॅरिस हल्ल्यानंतर रशियाने कडक पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ISISच्या ठिणाकांवर हे हल्ले करण्यात येत आहेत.
तुर्कीत दहशतवाद्यांनी रशियाच्या एका लढाऊ विमानाला रॉकेटने पाडले. त्यासंबंधिचा व्हिडिओ शूट करत असताना एक रशियाकडून डागण्यात आलेल्या रॉकेटचा स्फोट झाला आणि एका अतिरेक्याचा खात्मा झाला. तसेच कॅमेरा समोरील असणारा दुसरा दहशतवादी या हल्लात मारला गेला.
ठार झालेल्या पैकी एकाचे नाव अबु अहमद ममजा, असे आहे तर दुसऱ्या अतिरेक्याचे नाव समजू शकलेले नाही, असे वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.