कुवेत : विष्णूचं रूप मानल्या जाणाऱ्या सत्यनारायणाची पूजा केल्याबद्दल ११ भारतीय नागरिकांना अटक केल्याची घटना कुवेतमध्ये घडली आहे. सत्यनारायण पूजा हा भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असल्यानं या अटकेबद्दल नागरिकांच्या कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कुवेतमधील काही भारतीयांनी नवचेतना सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही संस्था सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेचं आयोजन करते. त्यावरून कधीच वाद झाला नव्हता.
यंदा मात्र त्यांनी या पूजेसाठी आवश्यक परवानगी घेतली नव्हती. कुवेतमधील कायदे कडक असल्यानं पोलिसांनी या आयोजनाची गंभीर दखल घेतली. त्यातच, काही नागरिकांनी सत्यनारायण पूजेच्या गोंधळामुळे त्रास झाल्याची तक्रारही केली. त्यामुळे पोलिसांनी ११ भारतीय नागरिकांना ताब्यात घेतलं आणि नंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
गेले १५ दिवस हे नागरिक जेलमध्ये आहेत. त्यांच्यावरील कारवाईबाबत कुवेत पोलीस स्पष्टपणे काहीच उत्तर देत नाहीत. त्यामुळे आता या नागरिकांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयानं प्रयत्न करावेत, अशी या मंडळींच्या कुटुंबियांची इच्छा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.