म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी चक्क सिंह झाडावर...

एक असा फोटो समोर आलाय की जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. म्हशींच्या कळपाला घाबरून जंगलाचा राजा सिंह चक्क झाडावर चढलाय. मात्र म्हशींच्या कळपानं झाडाभोवती फेर धरून सिंह खाली पडण्याची वाट पाहली.

Updated: May 26, 2015, 03:07 PM IST
म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी चक्क सिंह झाडावर... title=

नैरोबी: एक असा फोटो समोर आलाय की जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. म्हशींच्या कळपाला घाबरून जंगलाचा राजा सिंह चक्क झाडावर चढलाय. मात्र म्हशींच्या कळपानं झाडाभोवती फेर धरून सिंह खाली पडण्याची वाट पाहली.

६३ वर्षीय माजी सैन्य अधिकारी चार्ल्स कॉमिन केनियाच्या मासाई मारा रिझर्व्हचा फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी हे दृश्य पाहिलं. चार्ल्स आणि त्यांच्या पत्नीला याची अजिबात जाणीव नव्हती की, आपल्या ट्रीपच्या अखेरीस त्यांना असं काही दृश्य पाहायला मिळेल.

कॉमिन यांनी सांगितलं की, 'आपल्या गाईडसोबत त्यांनी फक्त म्हशींचा पाठलाग सुरू केला होता आणि म्हशी नवजात सिंहाचा पाठलाग करत होते. अचानक एक सिंह झुडुपामधून त्या छोट्या सिंहाला वाचवायला आला आणि तो झाडावर चछला. मात्र काही काळानं त्याची पकड ढिली होऊ लागली आणि तो झा़डावरून खाली पडला. ज्याची सर्व म्हशी वाट पाहत होत्या.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.