कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं

चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय. 

Updated: Sep 10, 2015, 10:12 AM IST
कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं title=

बीजिंग : चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, डेझेऊ शहरात राहणारं हे जोडपं सध्या वेगळं राहत आहे. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांना आपल्या दुसऱ्या पत्नीनं - यांगनं सांभाळावं असा या पतीचा अट्टहास होता. पण, यांगनं याला नकार दिला. त्यामुळे, या दोघांचे मार्ग वेगळे झाले होते. पण, यानंतरही यांगचा पती तिला फोन करून त्रास देत होता.

यामुळे, या वेळेसही पतीचा फोन तिनं रिसिव्ह केला नाही. यावर संतापलेला पती दुसऱ्या दिवशी तिच्या कामाच्या ठिकाणी दाखल झाला... आणि तिथंच त्यानं यांगवर हल्ला केला, असं यांगनं म्हटलंय. या हल्ल्यात यांग गंभीर जखमी झालीय. 

डॉक्टरांनी यांगच्या नाकावर तात्काळ सर्जरी करण्याचा सल्ला दिलाय. तिचं सगळं नाकच चावून खाण्यात आलंय. इतकंच नाही तर तिच्या नाकाच्या हाडांनाही इजा पोहचलीय. 

या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलीस यांगच्या पतीचा शोध घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.