www.24taas.com, नवी दिल्ली
फोर्ब्स मॅग्झिननं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा समावेश करण्यात आलाय. बराक ओबामांनी याही वेळेस प्रथम स्थानावर कायम आहेत.
फोर्ब्सने जगातल्या वीस शक्तीशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केलीय. सोनिया गांधी या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आहेत आणि तसंच जगातल्या दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था सोनियांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असल्याची प्रशंसा करण्यात आलीय. तर मनमोहनसिंग हे अर्थतज्ज्ञ भारतातल्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणांना आकार देत असल्याचं फोर्ब्सनं म्हटलंय.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी ३७ व्या आणि अर्सेलर मित्तलचे सीईओ लक्ष्मी मित्तल या यादीत ४० व्या क्रमांकावर आहेत.