नवी दिल्ली : नेपाळमध्ये वातावरण खराब झाल्याने, बचाव कार्य करणारी हेलिकॉप्टर्स काही तासांसाठी पुन्हा परतली आहेत.
नेपाळ अद्याप भूकंपाच्या तडाख्यातून बाहेर आलेला नसतानाही तेथे मेघगर्जनेसह मोठ्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
नेपाळमध्ये २७ आणि २८ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: पूर्व भागात ही शक्यता अधिक आहे, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
काठमांडूमधील हवामानात आर्द्रता आणि दमटपणा राहण्याची शक्यताही विभागाने वर्तविली आहे.
पुढील तीन दिवसांमध्ये भारतामध्ये हिमालयासह, पश्चिम बंगाल, सिक्कीमध्येही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.