कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

Updated: Apr 16, 2015, 04:54 PM IST
कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख! title=

लंडन: जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

हत्तींचा वापर संकटग्रस्त भागामध्ये लँडमाइन्सचा शोध घेण्यासाठी केला जावू शकतो आणि ते ड्रोनद्वारे खूप दुरूनही हे काम करू शकतो. हा शोध दक्षिण आफ्रिकेत केला गेलाय. ज्यात अमेरिकी सैन्य सुद्धा सहभागी होतं. अभ्यासादरम्यान हत्ती जेव्हा आपला पुढचा पाय उचलून टीएनटी स्फोटकाचा शोध लावण्याचे संकेत देतो तेव्हा त्याला बक्षीस म्हणून त्याचं आवडतं फळ खाऊ जावू शकतो. 

या शोधासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या अमेरिकन सैन्याच्या रिसर्च ऑफिसचे मुख्य वैज्ञानिक स्टीफन्स लीच्या मते, 'हत्ती या कामात खूप तल्लख आहे.' ते म्हणतात, हत्ती ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी कुत्र्यांच्या तुलनेत जास्त वेळेपर्यंत लक्षात ठेवतात. गेल्या वर्षी झालेल्या एका रिसर्चमध्ये या बाबीवर शिक्कामोर्तब झालंय की, सर्व प्राण्यांमध्ये हत्तींमध्ये वास घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. हत्तींमध्ये वास घेण्यासाठी जवळपास दोन हजार क्रोमोझोम असतात, जे कुत्र्यांच्या तुलनेत दुप्पट आणि मनुष्याच्या तुलनेत पाच पट असतात. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.