सौदीच्या टीव्ही चॅनल्सनं मिशेल ओबामांना 'ब्लर' करून दाखवलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा भारतदौरा हीट ठरला... पण, भारतानंतर लगोलग सौदी अरेबियाला गेलेल्या मिशेल ओबामा यांचा अरब देशातला हा दौरा मात्र वादग्रस्त ठरलाय. 

Updated: Jan 28, 2015, 05:23 PM IST
सौदीच्या टीव्ही चॅनल्सनं मिशेल ओबामांना 'ब्लर' करून दाखवलं? title=

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचा भारतदौरा हीट ठरला... पण, भारतानंतर लगोलग सौदी अरेबियाला गेलेल्या मिशेल ओबामा यांचा अरब देशातला हा दौरा मात्र वादग्रस्त ठरलाय. 

मिशेल ओबामा यांनी सौदी अरेबियात दाखल झाल्यानंतर आपल्या डोक्यावरून हिजाब न घेतल्यामुळे त्यांना स्थानिक टीव्ही चॅनल्सनं 'ब्लर' (अंधूक) करून दाखवल्याचं म्हटलं जातंय. स्थानिक टीव्ही चॅनल्सनं मात्र या गोष्टीला नकार दिला असला तरी फोटो आणि व्हिडिओ काही वेगळंच सांगताना दिसतायत. 

भारताचा दौरा आटोपताना मिशेल ओबामा यांनी विमानतळावर गुडघ्यापर्यंत लांब असलेला एक ड्रेस परिधान केला होता.... पण, इथून उड्डाण भरल्यानंतर सौदीला उतरलेल्या मिशेल ओबामा मात्र लांब पॅन्ट, टॉप आणि एक लांब फ्लोरल जॅकेटमध्ये दिसल्या. परंतु, अरब देशांतील स्त्रियांप्रमाणे त्यांनी आपल्या डोक्यावरून कपडा मात्र लपेटला नव्हता. 

सौदीच्या नियमांप्रमाणे, महिलांनी आपलं शरीर डोक्यापासून पायांपर्यंत झाकलेलं असणं आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांनी हिजाब परिधान करणं गरजेचं आहे. परंतु, हा नियम मात्र परदेशी महिलांसाठी लागू नाही. सौदीमध्ये स्त्रियांना गाडी चालवण्यासाठीही मनाई आहे, ज्याचा गेल्या अनेक वर्षांपासून विरोध होतोय.  

यावेळी, ओबामांच्या स्वागतासाठी आलल्या अधिकाऱ्यांनी बराक ओबामा यांच्याशी हात मिळवला. पण, मिशेल यांच्यासोबत हातही मिळवला नाही. त्यांच्या या वर्तनामुळे मिशेल मात्र खट्टू झाल्या. 

बराक आणि मिशेल ओबामा सौदीचे राजे अब्दुल्ला यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी सौदी अरेबियात दाखल झाले होते.  

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.