सोची : रशियन मीडियाच्या माहितीनुसार, रशियन लष्कराचे विमान सोची येथील उड्डाणानंतर काही मिनिटांतच रडारवरुन गायब झालेय.
टीयू -154 या विमानात एकूण ९१ प्रवासी असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलीये. विमानातील प्रवाशांमध्ये सैनिक, म्युझिक बँक आणि काही पत्रकारांचा समावेश आहे.
समाचार सेवा इंटरफेक्सच्या रिपोर्टनुसार, विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.२० मिनिटांनी उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर २० मिनिटांतच हे विमान रडारवरुन गायब झाले. या बेपत्ता विमानाचा शोध सुरु आहे.