भारत- दक्षिण कोरिया दरम्यान सात करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण कोरियानं आपल्या संबंधांचा स्तर वाढवत 'विशेष राजकीय भागीदारी'वर नेण्यासाठी संरक्षण क्षेत्रात सहयोग करण्यावर मंजुरी दिली. दोन्ही देशांनी दुहेरी करगणना टाळण्याचा करारासह सात करारांवर हस्ताक्षर केले. 

Updated: May 18, 2015, 07:02 PM IST
भारत- दक्षिण कोरिया दरम्यान सात करारांवर स्वाक्षरी title=

सेऊल: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण कोरियानं आपल्या संबंधांचा स्तर वाढवत 'विशेष राजकीय भागीदारी'वर नेण्यासाठी संरक्षण क्षेत्रात सहयोग करण्यावर मंजुरी दिली. दोन्ही देशांनी दुहेरी करगणना टाळण्याचा करारासह सात करारांवर हस्ताक्षर केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दक्षिण कोरियात दोन दिवसीय दौऱ्यासाठी सकाळी आगमन झालं. मंगोलियातून सकाळी साडेसातच्या सुमारास मोदींचं दक्षिण कोरियातल्या सेऊल इथं आगमन झालं. तिथं विमानतळावर मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. 

या कार्यक्रमानंतर भारतीय समुदायाच्या कार्यक्रमालाही मोदींनी हजेरी लावली. मानवता हाच आमच्या परराष्ट्र नीतिचा मंत्र आहे असं यावेळी मोदींनी भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं. आपल्याएवढाच तुमचाही भारतावर हक्क असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर मोदींना दक्षिण कोरिया सरकारकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात मोदी दक्षिण कोरीयाचे अध्यक्ष पार्क ग्यून-ही यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.