पाकिस्तानची पुन्हा पलटी, लक्वीच्या आवाजाचे नमुने घेणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीत २६/११ चा गुन्हेगार झकी उर रहमान लक्वी याच्या आवाजाचे नमुने देण्याचं कबूल केलंय. पण लक्वीच्या वकिलांनी मात्र नवाज शरीफ यांच्या आश्वासनाला छेद दिलाय.

PTI | Updated: Jul 13, 2015, 09:16 AM IST
पाकिस्तानची पुन्हा पलटी, लक्वीच्या आवाजाचे नमुने घेणार नाही! title=

लाहोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीत २६/११ चा गुन्हेगार झकी उर रहमान लक्वी याच्या आवाजाचे नमुने देण्याचं कबूल केलंय. पण लक्वीच्या वकिलांनी मात्र नवाज शरीफ यांच्या आश्वासनाला छेद दिलाय.

पाकिस्तानात आरोपीच्या संमतीशिवाय आवाजाचे नमुने घेताच येत नाहीत, असा खळबळजनक दावा लक्वीच्या वकिलांनी केलाय. त्यामुळे शरीफ यांनी दिलेल्या आश्वासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

दरम्यान, पाकिस्तानचे भारतातले राजदूत अब्दुल बासित यांनी लक्वीच्या वकिलांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं म्हटलंय. तर थोडा धीर धरा पाकिस्तानला लगेच विश्वासघातकी ठरवू नका, असं आवाहन बासित यांनी केलंय.पाकिस्तान सरकार लख्वीच्या विरोधात आवाजाचे नमुने मिळविण्यासाठी न्यायालयात कोणतीही नवीन याचिका दाखल करणार नाही. तशी याचिका दाखल करायची असेल संसदेत कायदा बनवावा लागेल, अशी पुष्टीही चौधरी यांनी जोडली.

दुसरीकडे पाकिस्तानातल्या कायद्याचं वास्तव बघता शरीफ यांनी शब्द देऊन तो फिरवला की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.