नेल्सन मंडेला रुग्णालयात

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या तब्बेत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हे. ते ९४ वर्षांचे आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 10, 2012, 04:10 PM IST

www.24taas.com,प्रिटोरिया
दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या तब्बेत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हे. ते ९४ वर्षांचे आहेत.
नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदविरूद्ध सातत्याने लढा दिला. कृष्णवर्णीयांच्या न्याय्य हक्कासाठी लढताना मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेतील गोर्यांबची राजवट उलथवून टाकली. १९९४ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झालेत. त्यांनी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. वर्णभेदासाठी त्यांनी अनेक वर्ष लढा दिला. ते २७ वर्ष तुरूंगातच होते. मंडेला यांना १९९३मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष मंडेला यांना प्रिटोरियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. काळजीचे करण्याचे कारण नाही, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी दिली आहे.
मंडेला यांच्या प्रकृतीत सतत चढउतार सुरू झाला. त्यानंतर शनिवारी मंडेला कुटुंबियांनी त्यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. कडेकोट बंदोबस्तात मंडेला यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.