अमेरिकेत मॉलमध्ये पुन्हा गोळीबार...

उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 5, 2013, 01:57 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, पॅरामस (न्यूजर्सी)
उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
‘डब्ल्यूसीबीएस’ टीव्हीनं दिलेल्या बातमीनुसार, काल रात्री जवळजवळ साडे नऊ वाजता वेस्टफिल्ड गार्डन स्टेट प्लाजामध्ये गोळीबार झाला. या घटनेत कोणत्याही व्यक्ती जखमी झाल्याची कोणतीही खबर मिळालेली नाही.
अजूनही मॉलच्या आतमध्ये अडकलेल्या लोकांनी टेलीव्हिजन स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉल बंद आहे. आपातकालिन रेडिओ प्रसारणांमध्ये म्हटल्यानुसार, इथं उपस्थित असलेले अधिकारी स्वाट टीम्सच्या येण्याची वाट पाहत आहेत. बंदूकधारी व्यक्तीशी अजून कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही.
हा मॉल मॅनहॅटनपासून ३५ किलोमीटर दक्षिण पश्चिममधील बर्गन काऊंटीमध्ये आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.