www.24taas.com, झी मीडिया, योबे
नायजेरियातील ईशान्य भागात बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी एका कॉलेजवर हल्ला केला आणि गाढ झोपलेल्या ५० विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारलं. जवळपास २०० दहशतवाद्यांनी मध्यरात्री १ वाजता हा हल्ला केला. योबे राज्याच्या गुज्बा इथल्या कृषी महाविद्यालयात हा घातपात झाला.
नायजेरियाचा स्वतंत्रता दिवस तीन दिवसांवर येवून ठेपला असतांना हा हल्ला करण्यात आलाय. महाविद्यालयाचे प्रवक्ते मोलिमा इदी मातो यांनी याला दुजोरा दिला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. एक हजार विद्यार्थी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. तेही या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. या कॉलेजपासून ४० कि. मी. अंतरावरील शाळेतही असाच घातपात करण्यात आला होता.
ईशान्य नायजेरियात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून, बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकांचे बळी घेतले आहेत. बोको हराम नायजेरियाला एक मुस्लीम राष्ट्र बनवू इच्छितात. याआधीही संघटनेनं नायजेरियावर असे घातक हल्ले केले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.